Thursday, November 15, 2012

जुनी वाईन - नवी बाटली


चीनमधील नेतृत्व-बदलाची प्रदीर्घ प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नोवेंबर ७ ते १४ या कालावधीत झालेल्या साम्यवादी पक्षाच्या १८ व्या पंचवार्षिक कॉंग्रेसमध्ये, २२६८ पक्ष-प्रतिनिधींनी ३७६ सदस्यांच्या केंद्रीय समितीची गुप्त मतदान पद्धतीने निवड केली आहे. चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नि:वर्तमान केंद्रीय समितीने शिफारस केलेल्या नव्या सदस्य सूचीतील ८% प्रतिनिधींना गुप्त-मतदान प्रक्रियेत बहुमत मिळवण्यात अपयश आले. मात्र, त्यांच्या ऐवजी निवड झालेल्या सदस्यांची शिफारस सुद्धा वरूनच करण्यात आली होती की काही पक्ष-प्रतिनिधींनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत केंद्रीय समितीत स्थान पटकावले, हे अद्याप कळालेले नाही. या नव-निर्वाचित केंद्रीय समितीने पोलीट-ब्युरो आणि पोलीट-ब्युरोच्या स्थायी समितीची निवड केली आहे. स्थायी समितीच्या ९ पैकी ७ सदस्यांना 'सक्तीची निवृत्ती' देण्यात आली आहे, यात विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांचाही समावेश आहे. तसेच, स्थायी समितीची सदस्य संख्या ९ वरून कमी करत ७ वर आणण्यात आली आहे. पोलीट-ब्युरोच्या एकूण २५ सदस्यांपैकी १० सदस्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. नव्या केंद्रीय समितीने विद्यमान पोलीट ब्युरो स्थायी समितीचे सदस्य आणि उप-राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांची साम्यवादी पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.    

पक्षाच्या १८ व्या कॉंग्रेसमध्ये सहभागी एकूण पक्ष-प्रतिनिधींपैकी २३% महिला, तर ११% चीनमधील अल्पसंख्यांक समुदायाचे प्रतिनिधी होते. महत्वाचे म्हणजे, खाजगी क्षेत्रात व्यापारी-उद्योजक असलेल्या ३४ व्यक्तींची कॉंग्रेस मध्ये सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली होती. सन २००२ मध्ये, खाजगी क्षेत्रात कार्यरत मंडळींसाठी साम्यवादी पक्षाची दारे उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्या वर्षीच्या कॉंग्रेस मध्ये अशा ७ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता, तर सन २००७ च्या १७ व्या कॉंग्रेस मध्ये १७ व्यापारी-उद्योजकांची वर्णी लागली होती. अर्थात, हे  आकडे फसवे आहेत कारण चीनमध्ये आर्थिक सुधारणा लागू करण्यात आल्यानंतर कित्येक पक्ष-कार्यकर्त्यांनी कुटुंबियांच्या नावे व्यापार-उद्योग सुरु करत सरकारी सवलती लाटल्या होत्या. या-पैकी अनेकजण कॉंग्रेस मध्ये पक्ष-प्रतिनिधी म्हणून सहभागी होत आले आहेत. पो क्षिलाई या अलीकडच्या काळात जनतेत लोकप्रिय ठरलेल्या, पण नंतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतलेल्या पोलीट-ब्युरो सदस्याची कॉंग्रेस सुरु होण्याआधीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. पो क्षिलाई च्या पत्नीला एका ब्रिटीश व्यापाऱ्याची हत्या केल्याच्या आरोपावरून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या पो क्षिलाई चे वडील सुद्धा साम्यवादी पक्षात उच्च-पदाधिकारी होते. त्याने माओ च्या विचारांचा प्राधान्याने प्रसार करणे सुरु केल्यापासून राजकीय निरीक्षकांच्या नजरा त्याचावर खिळल्या होत्या. मात्र, त्याची जाहीर लाजिरवाणी उचलबांगडी आणि बदनामीने एक गोष्ट सिद्ध झाली आहे, कि चीनचे विद्यमान आणि येऊ घातलेले नेतृत्व माओ च्या विचारांपेक्षा डेंग च्या विचारांना प्राधान्य देणारे आहे.

साम्यवादी चीनच्या स्थापनेनंतर पहिल्या पिढीच्या नेतृत्वावर माओ झेडॉंग चा वरचस्मा  होता. त्याचाच एकेकाळचा सहकारी पण वैचारिक मतभेदांमुळे दुरावला गेलेल्या डेंग क्षियोपिंगने दुसऱ्या पिढीला तारले होते. डेंग ने, सोविएत रशिया आणि दस्तरखुद्द चीन मध्ये त्याच्या डोळ्यांसमोर घडलेल्या सत्तासंघर्षातून धडा घेत, सत्तांतराची ढोबळ मार्गदर्शक तत्वे आखून दिली होती. साम्यवादी पक्षाच्या अमर्यादित सत्तेच्या निश्चितीसाठी सर्वोच्च स्थानी आरूढ नेत्यांचा कार्यकाळ मर्यादित करत सामुहिक नेतृत्वाची उभारणी करणे आवश्यक आहे, या निर्णयाप्रत डेंग पोचला होता. यानुसार, खऱ्या अर्थाने चीन मधील पहिला शांततापूर्ण नेतृत्वबदल सन २००२ मध्ये झाला होता, ज्यावेळी जियांग झेमिन ने सूत्रे हू  जिंताव या चौथ्या पिढीच्या नेत्याकडे सोपवली होती. डेंग च्या मार्गदर्शक तत्वानुसार, चीनच्या सर्वोच्च नेत्याकडे १० वर्षांच्या कालावधीसाठी ३ पदे सोपवण्यात येतात; पक्षाचे महा-सचिवपद, राष्ट्राध्यक्षपद आणि केंद्रीय लष्कर समितीचे अध्यक्षपद! या १० वर्षांपैकी ५ वर्षाचा कार्यकाळ झाल्यावर, त्याच्या उत्तराधिकारयाची नेमणूक करावयाची असते, जेणेकरून सत्तांतराची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि नव्या नेतृत्वाला अनुभवाचे भान यावे. यानुसार, सन २००७ मध्येच, साम्यवादी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व-मंडळाने क्षी जिनपिंग यांची उप-राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक करत, ते हू जिंताव यांचे उत्तराधिकारी असतील असे स्पष्ट संकेत दिले होते. आता सलग दुसऱ्यांदा नेतृत्वबदल पूर्वनिर्धारित  योजनेनुसार आणि शांततापूर्ण मार्गाने होत असल्याने, साम्यवादी शासन-पद्धतीला स्थैर्य प्राप्त झाल्याचे जगावर ठसवण्याचा चीन चा प्रयत्न असणार आहे. मात्र, क्षी जिनपिंगच्या नेतृत्वातील पाचव्या पिढीमध्ये, पहिल्या पिढीच्या क्रांतीकारी नेत्यांच्या वारसदारांनी मोठ्या प्रमाणात वर्णी लावल्यामुळे, साम्यवादी पक्षाच्या वटवृक्षाखाली चीनची वाटचाल सामुहिक घराणेशाहीच्या दिशेने होण्यास सुरुवात झाली आहे, असे टीकाकारांचे मत आहे. नव्या केंद्रीय समितीने निवडलेल्या ७ पोलीट-ब्युरो स्थायी सदस्यांपैकी ४ नेते राजकीय दृष्ट्या प्रभावशाली कुटुंबातून येतात. खुद्द, ५९-वर्षीय नवे सरचिटणीस क्षी जिनपिंग, यांच्या वडिलांनी डेंग च्या मार्गदर्शनाखाली आर्थिक सुधारणा राबवण्याचे बिकट काम कौशल्याने केले होते. 

नव्या स्थायी समितीवर माजी राष्ट्राध्यक्ष जिआंग झेमिन आणि नि:वर्तमान राष्ट्राध्यक्ष हू जिंताव यांचे वर्चस्व कायम आहे. मार्च २०१३ मध्ये ज्यांची पंतप्रधानपदी वर्णी लागणार आहे ते ली केकीयांग हे, हू जिंताव यांना जवळचे आहेत, तर इतर ३ सदस्य जिआंग यांच्याशी असलेल्या 'जवळकी' मुळे पुढे आले आहेत. ५७-वर्षीय ली केकीयांग नव्या स्थायी समितीतील सर्वात तरुण सदस्य आहेत. क्षी आणि ली वगळता इतर ५ सदस्य वयाच्या 'मध्य-साठी' मध्ये असल्याने त्यांचा कार्यकाळ पुढील ५ वर्षांपुरता मर्यादित असणार हे सुद्धा आता स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ, ५ वर्षानंतर क्षी आणि ली या जोडीला कोणी आव्हान देणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नव्या नेतृत्व गटाची निवड करतांना, ज्या प्रमाणे पो क्षिलाई सारख्या 'माओवादी' म्हणवून घेणारया नेत्याला संपूर्ण बाजूस सारण्यात आले, त्याच प्रमाणे वांक यांक सारख्या आर्थिक सुधारणांसह राजकीय सुधारणा राबवण्यास उत्सुक नेत्यांना पदोन्नती देण्याचे टाळण्यात आले आहे. म्हणजेच, नव्या नेतृत्वाच्या कार्यकाळात आर्थिक सुधारणा सुरूच राहतील, पण राजकीय सुधारणांबाबत 'नरो वा कुंजरोवा' अशी भूमिका घेण्यात आली आहे. 

राजकीय सुधारणा राबवल्यास, आर्थिक सुधारणांचा फटका बसलेल्या कामगारांना आणि विस्थापित झालेल्या शेत-मजुरांना त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी व्यासपीठ मिळू शकते आणि त्यामुळे आर्थिक सुधारणांना खिळ बसू शकते ही भीती चिनी राज्यकर्त्यांच्या मनात आहे. आर्थिक सुधारणांमुळे चीन मधील सार्वत्रिक गरिबी लक्षणीय प्रमाणात कमी होऊन साम्यवादी पक्षाच्या समर्थनात वाढ झाली हे सत्य असले तरी, दुसरीकडे या सुधारणांमुळे बेरोजगारी, रोजगार गमावण्याचे भय आणि आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात वाढली हे सुद्धा तथ्य आहे. आर्थिक सुधारणांना लगाम लावल्यास निम्न:मध्यम वर्गीय, मध्यम वर्गीय आणि नव्याने श्रीमंत झालेल्या गटांचे समर्थन गमवावे लागेल, तसेच चीनच्या जागतिक अर्थसत्ता होण्याच्या महत्वकांक्षेवर पाणी फेरले जाईल असे साम्यवादी पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र त्याच वेळी, गरीब, विस्थापित आणि कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या रोषामुळे उत्पन्न होणाऱ्या सामाजिक अशांतीची झळ साम्यवादी पक्षास लागणार याची जाणीव सुद्धा साम्यवादी नेतृत्वाला आहे. यामध्ये संतुलन साधण्यासाठी, एकीकडे, सुधारणा धार्जीण्यांना खुश करण्याकरता भ्रष्टाचार चीन चा प्रमुख शत्रू असल्याची ग्वाही देत त्याविरुद्ध एल्गार पुकारण्याची भाषा वापरण्यात येत आहे, आणि दुसरीकडे, असंतुलीत विकासाला नियंत्रित करण्यासाठी धोरण-निर्मितीत जनतेच्या सहभागाला महत्व देण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी, हू  जिंताव यांच्या 'विकासाचा वैज्ञानिक दृष्टीकोन' या तथाकथित सिद्धांताला, पक्ष-घटनेत समाविष्ट करून घेत मार्क्शिस्म-लेनिनिस्म, माओ चे विचार, डेंग क्षियोपिंग चे सिद्धांत आणि जिआंग झेमिन यांचा 'तीन प्रतीनिधीत्वाचा' सिद्धांत यांच्या पंगतीत बसवण्यात आले आहे. 'विकासाचा वैज्ञानिक दृष्टीकोन' या  सिद्धांतानुसार, लोकांमधील आर्थिक विषमता, शहरी-ग्रामीण भांगातील दरी आणि देशाच्या पूर्व-पश्चिम प्रदेशांतील विकास-असंतुलन या मुद्द्यांकडे साम्यवादी पक्षाला तत्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. चीनमधील वास्तविक समस्यांची साम्यवादी नेतृत्वाला जाणीव आहे, ही १८ व्या कॉंग्रेसची जमेची बाजू म्हणता येईल. मात्र, या समस्या 'साम्यवादी पक्षाच्या' एककल्ली दृष्टीकोनातून सुटतील हा भाबडा आशावाद सुद्धा या कॉंग्रेस च्या निमित्त्याने पुन्हा स्पष्ट झाला आहे. वास्तविकता आणि आशावाद यांची सांगड घालण्याचे महत्कार्य नव्या नेतृत्वाला करायचे आहे. या कसौटीत, क्षी आणि ली यांची जोडी कितपत खरी उतरते यावर चीनच्या साम्यवादी पक्षाचे, चीनचे आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.                        

निवडणुकीचे चक्रीवादळ


गेल्या ५ महिन्यांपासून गाजत असलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीची सांगता बराक ओबामा यांच्या फेर-निवडीने झाली. या निमित्त्याने, वरकरणी सोपी भासत असलेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील किचकट प्रक्रियेची तोंड-ओळख राज्यशास्त्राच्या नव्या विद्यार्थ्यांना झाली. तसेच, सामान्य नागरिकांसह राजकीय निरीक्षकांनाही चक्रावून टाकणाऱ्या अमेरिकी निवडणूक पद्धतीतील गुणदोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेत. जर ओबामा-रोम्नी लढत बरोबरीत सुटली असती, किव्हा विजय म्हणवण्यास लाज वाटेल इतक्या कमी अंतराने कोणी जिंकले असते, तर या पद्धतीतील दोषांवर अधिक सविस्तर चर्चा होऊन काही समर्थ पर्याय पुढे आले असते. मात्र, निकालांमध्ये ओबामांनी मुसंडी मारत रोम्नी यांना चीत केल्याने अमेरिकेतील निवडणूक सुधारणांची चर्चा निश्चितच मागे पडली आहे. असे असले तरी, ही पद्धत नेमकी कशी आहे हे सखोल जाणून घेण्याची संधी अभ्यासकांना या निवडणुकीने दिली, हे मात्र खरे!

अमेरिकेत दर लीप वर्षाच्या नोवेंबर महिन्यातील पहिल्या सोमवार नंतरच्या मंगळवारी 'निवडणूक दिवस' उगवत असतो. सरळसोप्या भाषेत सांगायचे तर, दर ४ वर्षांनी २ ते ८ नोवेंबर दरम्यान येणाऱ्या मंगळवारी नवा राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी सार्वत्रिक मतदान होते, या दिवसाला अधिकृतपणे 'इलेक्शन डे' म्हणतात. या दिवशी अमेरिकी मतदार फक्त राष्ट्राध्यक्ष निवडीसाठीच मतदानाचा हक्क बजावत नाही तर, अमेरिकी कॉंग्रेस (म्हणजे संसद) चे कनिष्ठ सदन असलेल्या ४३५ सदस्यीय लोकप्रतिनिधी गृहासाठी (हाउस ऑफ रिप्रेसेंटेटीव) आणि वरिष्ठ सदन असलेल्या सिनेटच्या एक त्रीतीयांश जागांसाठी, तसेच  अनेक राज्यांचे गवर्नर आणि राज्य-विधानसभांचे लोक-प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करतात. यंदाच्या निवडणुकीत डेमॉक्रेटीक पक्षाचे ओबामा राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवडून आले असले तरी, हाउस ऑफ रिप्रेसेंटेटीव मध्ये रोम्नी यांच्या रिपब्लिकन पक्षाने बहुमत कायम ठेवले आहे. हाउस ऑफ रिप्रेसेंटेटीव चा कालावधी केवळ २ वर्षांचा असतो. आता सन २०१४ मध्ये या सदनासाठी निवडणुका होतील जेव्हा डेमॉक्रेटीक पक्षाला बहुमत मिळवण्याची संधी मिळेल. पण तोवर, ओबामा लंगडे राष्ट्राध्यक्ष ठरतील, म्हणजे नवे कायदे आणि मनानुसार अर्थसंकल्प पारीत करण्यासाठी त्यांना विरोधकांवर विसंबून रहावे लागेल. १००-सदस्यीय सिनेट मध्ये सुद्धा, डेमॉक्रेटीक पक्षाला ५१-सदस्यांसह जेमतेम बहुमत प्राप्त आहे. अर्थात, अमेरिकी कॉंग्रेसमधील विरोधी सदस्य सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे प्रसंग या देशाच्या राजकारणात अनेकदा आलेले आहेत. एखाद्या मुद्द्यावर राष्ट्राध्यक्षांचा वैचारिक दृष्टीकोन पटत असला तर विरोधी पक्षातील काही सदस्य त्यांच्या प्रस्तावांचे उघड समर्थन करतात. यामध्ये, साधारणत: लाचखोरी किव्हा घोडेबाजाराचा प्रकार नसल्याने, अशा 'सद्सदविवेकबुद्धी' जागृत असणाऱ्या कॉंग्रेस-सदस्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उभारण्याचा कायदा करण्याची आवश्यकता अमेरिकेला भासलेली नाही. राष्ट्राध्यक्षपदी ओबामा, हाउस ऑफ रिप्रेसेंटेटीव मध्ये रिपब्लिकन बहुमत आणि सिनेट मध्ये डेमॉक्रेटीक पक्षाचे काठावरचे बहुमत हा गुंतागुंतीचा निकाल हेच दर्शवतो की, अमेरिकी मतदारांनी ओबामा यांच्या बाजूने फारसे उत्साहाने मतदान केलेले नाही, तर धनाढ्य उद्योगपती मिट रोम्नी राष्ट्राध्यक्षपदी नकोत या भावनेने हा कौल दिलेला आहे. 

अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेत काळाच्या ओघात निर्माण झालेल्या पक्षांतर्गत उमेदवार निवडीच्या प्रक्रियेचा अप्रत्यक्ष फटका रोम्नी यांना बसला, असे हा निकाल सूचित करतो आहे. रिपब्लिकन पक्षाच्या 'प्रायमरीज' मध्ये, म्हणजे राज्यवार पक्षांतर्गत निवडणुकीच्या प्रक्रियेत, इतर उमेद्वारांपेक्षा आपले जहालपण सिद्ध करण्यासाठी रोम्नी यांनी घेतलेल्या अनेक भूमिका त्यांना सार्वत्रिक निवडणुकीत अंगलट आल्यात. साधारणत: विद्यमान राष्ट्राध्यक्ष जर पुन्हा निवडणूक लढवत असेल तर त्याच्या पक्षातून इतर इच्छुक लगेच माघार घेतात आणि त्या पक्षाला 'प्रायमरीज' ची गरज लागत नाही. यानुसार, यंदा बराक ओबामा यांना पक्षांतर्गत आव्हान देण्यात आले नव्हते मात्र, रोम्नी यांना रिपब्लिकन पक्षात अनेक इच्छुकांना मात देत आपली उमेदवारी निश्चित करावी लागली होती. रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीज मध्ये रोम्नी यांनी श्रीमंतांवर जास्त कर लावण्याला केलेला विरोध, स्वस्त आरोग्य सुविधा पुरवणारा ओबामा यांचा नवा कायदा रद्दबातल करण्याचा केलेला संकल्प आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात केलेली भडक विधाने यावरून डेमॉक्रेटीक पक्षाने त्यांच्याविरुद्ध प्रचाराचे रान उठवले होते. नंतर रोम्नी यांनी यापैकी अनेक भूमिका मवाळ केल्यात, पण तोवर बराच उशीर झाला होता. या 'प्रायमरीज' मध्ये प्रत्येक राज्यातून पक्षाचे प्रतिनिधी निवडले जातात, ज्यांची निवड त्या 'पक्षाचे मतदार' म्हणून नोंदणी केलेले नागरिक करतात, आणि हे प्रतिनिधी शेवटी एकत्रितपणे पक्षाचा अंतिम उमेदवार ठरवतात. 'प्रायमरीज' मध्ये 'गुप्त मतदान' पद्धती अवलंबली जाते. काही राज्यांमध्ये 'प्रायमरीज' ऐवजी 'कॉकसेस' आयोजित केली जातात, ज्यामध्ये 'गुप्त मतदाना' ऐवजी प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांची शिरगणती करण्यात येते. दोन्ही पक्षाच्या  राज्यवार समित्या आपापल्या राज्यातील पक्षांतर्गत निवडणुकीचे नियम आणि अटी तयार करत असतात. आपला नेता ठरवण्याची एवढी मोकळी लोकशाही-केंद्रित प्रक्रिया दुसऱ्या कोणत्याही राजकीय प्रणालीच्या पक्षांमध्ये आजवर अस्तित्वात आलेली नाही.         

पक्षांतर्गत उमेदवार ठरवण्याची अमेरिकी पद्धत जेवढी अनुकरणीय आहे, तेवढीच राष्ट्राध्यक्षीय निवडीची 'इलेक्टोरल गट' पद्धती वादग्रस्त आणि प्रश्नार्थक आहे. पक्षांतर्गत उमेदवार निवडीची प्रक्रिया अमेरिकेच्या राष्ट्रीय राज्यघटनेत नमूद केलेली नाही, तर ती राजकीय प्रणालीच्या परिपक्वतेच्या प्रवासात विकसित झालेली आहे. मात्र, 'इलेक्टोरल गट' पद्धती राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आहे. यानुसार, अमेरिकी संघराज्याच्या प्रत्येक घटक राज्याने त्यांच्या कॉंग्रेस मधील सदस्य संख्येच्या प्रमाणात 'इलेक्टोरल गट' निवडून दिला पाहिजे, जो राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत मतदान करेल. म्हणजे, प्रत्येक राज्याचे हाउस ऑफ रिप्रेसेंटेटीव आणि सिनेट मध्ये जेवढे सदस्य असतील, तेवढ्या सदस्य-संख्येचा 'इलेक्टोरल गट'' ते राज्य तयार करेल. हाउस ऑफ रिप्रेसेंटेटीवच्या प्रतिनिधींची संख्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरत असते, तर प्रत्येक राज्याचे सिनेट मध्ये २ सदस्य असतात. यानुसार, जास्त लोकसंखेच्या राज्यांचे 'इलेक्टोरल गट'' तेवढेच मोठे असतात, आणि कमी लोकसंखेच्या राज्यांचे 'इलेक्टोरल गट' तेवढेच छोटे असतात. संपूर्ण 'इलेक्टोरल गटाची' सदस्य संख्या ५३८ एवढी आहे. यामध्ये, डिस्ट्रीक ऑफ कोलंबिया या कॉंग्रेस मध्ये प्रतिनिधित्व नसलेल्या जिल्ह्याच्या ३ प्रतिनिधींचा समावेश आहे. 'इलेक्टोरल गटाच्या' निवडीची प्रक्रिया ठरवण्याचा सर्वाधिकार प्रत्येक राज्याला आहे. ५० पैकी ४८ राज्यांमध्ये, ज्या राष्ट्राध्यक्षीय उमेदवाराला मतदारांचे सर्वात जास्त समर्थन मिळते त्याचे सर्व प्रतिनिधी त्या राज्याच्या 'इलेक्टोरल गटात' निवडले जातात. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया या सर्वाधिक ५५ सदस्यांचा 'इलेक्टोरल गट' असलेल्या राज्यात ओबामांना ५९.१% आणि रोम्नी यांना ३८.६% मते मिळाली असली तरी, या राज्यातील 'इलेक्टोरल गटात' सर्व ५५ प्रतिनिधी ओबामा यांच्या पक्षाचे असतील. त्याचप्रमाणे, ओहिओ या परंपरागत रिपब्लिकन पक्षाकडे असणाऱ्या, पण मागील निवडणुकीपासून  डेमॉक्रेटीक पक्षाकडे कल झुकलेल्या राज्यात, ओबामांना ५०.१% आणि रोम्नी यांना ४८.२% मते मिळाली असली तरी, संपूर्ण १८-सदस्यीय 'इलेक्टोरल गट' ओबामांच्या पदरी पडणार आहे. या 'जिंकणारयाला सर्व काही' देणाऱ्या पद्धतीत प्रामुख्याने २ दोष आहेत; एक, उमेदवाराला मिळणारी लोकप्रिय मते आणि त्याच्या झोळीत पडणारा 'इलेक्टोरल गट' यांचे प्रमाण गडबडण्याची नेहमीच शक्यता असते. असे सुद्धा होऊ शकते की, एखाद्या उमेदवाराला देशपातळीवर ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत, पण 'इलेक्टोरल गटांतील' ५० टक्क्याहून कमी प्रतिनिधी त्यांच्या समर्थनार्थ आहेत. दोन, या पद्धतीमुळे पक्ष आणि उमेदवारांचे जास्तीत जास्त लक्ष स्पष्ट कौल नसलेल्या काहीच राज्यांकडे लागून असल्याने, परंपरागत दृष्ट्या या किव्हा त्या पक्षाकडे कायम असलेल्या राज्यातील निवडणूक प्रक्रिया एकंदरीतच निरर्थक ठरते. यंदाची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक, या न्यायाने, प्रचाराचा अखेर होईतोवर कौल कळू न देणाऱ्या १४ राज्यांमध्येच खऱ्या अर्थाने लढली गेली. डेमॉक्रेटीक पक्षाच्या सुदैवाने या निवडणुकीत ओबामांच्या पारड्यात ५०% लोकप्रिय मते आणि ५० टक्क्यांहून अधिक 'इलेक्टोरल कोलाज' ची मते  पडली असल्याने त्यांच्या निवडीवर कुठल्याही प्रकारचे प्रश्नचिन्ह लागणार नाही.  मात्र, चक्रीवादळाप्रमाणे संपूर्ण अमेरिकेला ढवळून काढणाऱ्या घमासान प्रक्रियेनंतर सुद्धा, खऱ्या अर्थाने लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष निवडून येतोय कि नाही, ही टांगती तलवार प्रत्येक निवडणुकीत उभी ठाकणार असेल तर निवडणूक पद्धतीत आमुलाग्र बदल करण्याबाबत तिथल्या राजकीय व्यवस्थेला गंभीर चिंतन करावे लागणार आहे!    

१९६२ चे 'युद्धबंदी'


सन १९६२ च्या ऑक्टोबर महिन्यात भारत-चीन युद्धाला तोंड फुटले होते. या युद्धात चीनच्या हातून पराभूत झाल्याचे शल्य, या घटनेनंतर जन्माला आलेल्या तिसरया पिढीला सुद्धा बोचते आहे. मात्र, दोन्ही देशांच्या सरकारांनी युद्धाच्या पन्नाशीवर टिप्पणी करणे टाळले आहे. भारत सरकारने निदान, यंदा प्रथमच या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देत, घटनेची जाणीव असल्याचे प्रदर्शित केले; मात्र, चीन च्या सरकारने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे, युद्धाची पन्नाशी 'साजरी' करण्यात भारतीय 'कुटनितज्ञ' समुदायाने चीनच्या प्रसारमाध्यमांवर मात केली आहे. भारताने मागील ६५ वर्षात नोंदवलेल्या लष्करी विजयांच्या आठवणी जेवढ्या तीव्रतेने काढल्या जात नाहीत, त्याही पेक्षा जास्त प्रमाणात पराभवावर सवंग चर्चा करण्यात येत आहे. या बाबतीत, हे तज्ञ, अपयश विसरून जाऊन यशाच्या क्षणांचे गुणगान करण्याच्या मानवी स्वभावाविरुद्धचे आचरण करत आहेत.खरे तर अपयश जिव्हारी लागणे चांगलेच असते, कारण त्यातून योग्य ते धडे घेत भविष्यात यशाच्या दिशेने वाटचाल करता येते. मात्र, दुर्दैवाने मागील ५० वर्षात आणि आता सुद्धा, युद्धाला आणि पराभवाला कारणीभूत  परिस्थितींची आणि निर्णयांची कठोर चिकित्सा करण्याऐवजी उथळ आगडपाखड करून राग व्यक्त करण्यात धन्यता मानली जात आहे.      

सन १९६२ मध्ये उत्तर-पूर्व सीमेवर भारताच्या पानिपताची अनेक कारणे आजवर वेगवेगळ्या सूत्रांकडून देण्यात आली आहेत. आता या घटनेच्या पन्नाशी निमित्य सगळ्या कारणांना उजाळा देण्यात येत आहे. मात्र, प्रख्यात परराष्ट्र तज्ञ सी. राजा मोहन यांनी वर्णन केल्यानुसार, 'सध्या सुरु असलेल्या चर्चांमुळे वातावरण तापत असले, तरी त्यातून, झालेल्या घटनेवर प्रकाश पडत नाहीय!' भारत्-चीन युद्धात नामुष्की पत्करावी लागल्यानंतर सत्ताधारी कॉंग्रेस नेतृत्वाने सुव्यवस्थितपणे, 'चीनने दगाबाजी करत पाठीत खंजीर खुपसला' असा प्रचार जनतेपर्यंत नेत, जबाबदारी स्वीकारण्याऐवजी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या बाजूला, जनसंघ ते समाजवादी या सर्वांनी युद्धात पराभवासाठी तत्कालीन पंतप्रधानांना  जबाबदार ठरवत संपूर्ण खापर नेहरू-कृष्णा मेनोन जोडीवर फोडले होते. अनेक तठ्स्थ निरीक्षकांनी लष्करी नेतृत्वाच्या निर्णयातील चुकांवर बोट दाखवत, त्यांनी ऐनवेळी कच खाल्ली नसती तर चीनचे आक्रमण काही काळ तरी थोपवणे शक्य झाले असते अशी पुष्टी केली आहे. तसेच, काही पाश्चिमात्य अभ्यासकांनी भारतातील सर्वसामान्य धारणेविरुद्ध निष्कर्ष काढले आहेत. एकीकडे नेहरूंनी अत्यंत ताठर भूमिका घेत चीनशी वाटाघाटी करण्याचे राजनैतिक मार्ग बंद केलेत, आणि त्याच सुमारास लष्करासाठी 'फॉरवर्ड पॉलिसी' ला मान्यता देत सीमारेषेवरील वादग्रस्त भागात लष्करी गस्त वाढवून चीनला खिजवण्याचा प्रकार सतत सुमारे २ वर्षे केल्याने युद्धास तोंड फुटले, असे नेविल मैक्सवेल या ब्रिटीश पत्रकाराने त्याच्या 'इंडियाज चायना वॉर' या पुस्तकात प्रमाणित केले आहे. याशिवाय, चीनला 'तिसऱ्या जगाचे' नेतृत्व भारताच्या हाती जाऊ द्यायचे नव्हते आणि या साठी जागतिक स्तरावर भारताला दुबळे ठरवण्यासाठी जाणीवपूर्वक माओ ने नेहरूंना अद्दल घडवली, असे भारतातील अनेक परराष्ट्र क्षेत्रातील धुरिणांचे मत आहे. भारतीय नेतृत्वाचे नेमके काय चुकले याबाबत विविध मत-प्रवाह आहेत. त्यांचा एकत्रितपणे विचार केल्यास असे लक्षात येते कि भारत-चीन दरम्यान झालेला संघर्ष हा दोन भिन्न राजकीय संस्कृती आणि भिन्न वैश्विक दर्शनामुळे घडून आला आहे. नव्याने स्वतंत्र झालेला भारत आणि नव्याने समाजवादी गणतंत्राची स्थापना झालेला चीन यांना एकमेकांना समजून घेण्यात सपेशल अपयश आल्याचे रुपांतर सशस्त्र संघर्षात झाले. चीनमधील एक-पक्षीय सत्ता केंद्रातील निर्णय प्रक्रिया आणि तिबेटबाबतची संवेदना भारताला नीट समजली नाही, तर भारतातील बहु-पक्षीय राजकारणाचे स्वरूप आणि निवडणूक केंद्रित विधाने यांचा विपर्यास चिनी नेतृत्वाने केल्याने दोन्ही देशांचे लष्कर एकमेकांपुढे उभे ठाकले. त्यात, जागतिक राजकारणाबाबत भारताची भूमिका स्वातंत्र्यापासून स्थायी होती, तर चीनची भूमिका आणि त्यानुसार धोरण बदलत होते. चीनच्या बदलत्या धोरणांचा माग घेण्यात भारताला अपयश आले आणि नको असलेलेले युद्ध दारी आले.     
 
भारत-चीन युद्धाचे योग्य विश्लेषण न होण्याच्या मुळाशी आहे भारत सरकारने या बाबत आतापर्यंत पाळलेली गुप्तता! राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून अद्याप सन १९६२ आणि त्या आधीचे महत्वपूर्ण दस्तावेज अभ्यासकांसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. आधुनिक लोकशाही प्रणालीच्या देशांमध्ये साधारणत: २० वर्षांमध्ये सर्व सरकारी दस्तावेज अभ्यासासाठी उपलब्ध केले जातात. मात्र, भारताने ब्रिटीशकालीन लालफीतशाहीचे प्रशासकीय धोरण जारी ठेवले असल्याने राज्यकर्त्यांच्या निर्णय प्रक्रियेबाबत आणि निर्णयांच्या कारणांबाबत सदैव अंधारमय चित्र बघावयास मिळते. गैर-कॉंग्रेस सरकारांनी सुद्धा, विशिष्ट काळानंतर राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीत निर्णयांची सर्व कागदपत्रे खुली करण्याबाबत, कधी पुढाकार घेतला नाही आणि अजूनही तशी जोरकस मागणी केलेली नाही, हे विशेष! युद्धातील पराभवाचे विवेचन करण्यासाठी स्वत: सरकारने नेमलेल्या एन्डरसन ब्रूक्स-भगत समितीचा अहवाल थंड बस्त्यात गुंडाळून ठेवण्यात आला आहे. प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नायर यांनी 'माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत' हा अहवाला मागविला असता, केंद्रीय सतर्कता आयोगाने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येण्याचे कारण देत अहवाल सुपूर्द करण्यास मनाई केली. युद्धानंतर सुरुवातीच्या काही वर्षात राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव अहवाल दडपून ठेवणे रास्त वाटू शकते, मात्र ५० वर्षानंतर परिश्तिती आमुलाग्र बदलली आहे आणि आज अहवाल जाहीर झाल्यास 'शत्रूच्या' हाती गोपनीय माहिती लागण्याची शक्यता नगण्य आहे. कायदेतज्ञ आणि स्तंभलेखक ए. जी नुरानी यांच्या मते ब्रूक्स-भगत अहवालाची एक प्रत नेविल मैक्शवेल या वर उल्लेखलेल्या ब्रिटीश लेखकाकडे निश्चितच आहे, कारण त्याचे संदर्भ मैक्शवेल  यांनी विविध लिखाणात दिले आहेत. या अहवालाचे एक लेखक एन्डरसन ब्रूक्स आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा परकीयांना हा अहवाल सहज प्राप्त होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने अहवाल जाहीर न करण्याला काही अर्थ उरलेला नाही. कदाचित, विकीलीक्सच्या माध्यमातूनच हा अहवाल प्राप्त होण्याचे भारतीयांच्या भाग्यात असावे!      

सन १९६२ च्या युद्धात भारताची मानहानी झाली आणि चीन ने रणांगणात वर्चस्व गाजवले. मात्र, त्यानंतर चीनच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या 'विजयाचा' सार्वजनिक उल्लेख करण्याचे सदैव टाळले. सन १९३७ चे चीन-जपान युद्ध आणि सन १९५०-५३ दरम्यानचे कोरियन युद्ध या २० व्या शतकातील २ युद्धांचा आणि त्यात गाजवलेल्या पराक्रमांचे चीनचे राज्यकर्ते नेहमी गौरवाने वर्णन करतात; मात्र सन १९६२ च्या मर्दुमकीची तुतारी वाजवण्याचे टाळतात, हे विशेष! युद्धाच्या पन्नासीत सुद्धा चीन ने अद्याप शेखी मिरवलेली नाही. याची तीन कारणे असू शकतात. एक तर चिनी समाज आणि भारतीय समाजाचे परंपरागत वैर नाही. त्यामुळे, जपान विरोधी प्रचाराचा ज्या प्रकारे चीन च्या राज्यकर्त्यांना अंतर्गत राजकारणात फायदा होतो, तसा भारत विरोधी प्रचाराचा होत नाही. दुसरे, भारतावर आक्रमणाने 'तिसरया जगातील' गरीब आणि दुबळ्या देशांदरम्यान चीन ची पत हवी तशी वाढण्याऐवजी त्याच्या हेतूंविषयी चिंता उत्पन्न झाल्यात; ज्यामुळे भारतावर विजय मिळवण्याचा ढोल बडवणे श्रेयस्कर राहिले नाही. तिसरे, भारताशी शत्रुत्वाऐवजी मैत्री असणे राष्ट्र हिताचे आहे कारण जागतिक राजकारणात अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांना सहकार्य करावे लागते, तसेच भारत चीन-विरोधी गटांत सामील झाल्यास डोकेदुखी वाढू शकते याची जाणीव चीन च्या राज्यकर्त्यांना झाली असण्याची शक्यता आहे. अर्थात, वादग्रस्त भागावरील आपला अधिकार चीन सहजासहजी सोडणार नाही,  हे सुद्धा तेवढेच खरे आहे. 

युद्धाच्या ५० वर्षे नंतर, दोन्ही देशांची सरकारे आणि मोठ्या प्रमाणात परराष्ट्र तज्ञ, इतिहासकार आणि दोन्ही देशातील सुजाण नागरिक किमान तीन महत्वपूर्ण निष्कर्षाप्रत पोचले आहेत. एक, सीमा प्रश्न प्रलंबित असला तरी इतर क्षेत्रामध्ये द्वी-पक्षीय सहकार्य बळकट करणे दोन्ही देशांच्या हिताचे  आहे; दोन, सीमा प्रश्न संघर्षाऐवजी चर्चा आणि वाटाघाटीतून सोडवला जावा; आणि तीन, सीमा प्रश्नाचे समाधान देवाण-घेवाणीच्या सिद्धांतानुसार होणे दीर्घकालीन द्वी-पक्षीय मैत्रीसाठी उपयुक्त आहे. सीमा प्रश्नावरील अंतिम तोडगा हा केवळ भू-प्रदेशांवरील सीमा रेखा निश्चित करणे आणि एकमेकांच्या अधिकार क्षेत्रातील प्रदेशांचे राष्ट्रीयत्व निर्धारित करण्यापुरता मर्यादित असणार नाही, तर व्यापक राजकीय कराराचा एक भाग असेल ज्या मध्ये तिबेट, तैवान आणि काश्मीर प्रश्न, अण्वस्त्र-बंदी, भारताचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सभासदत्व इत्यादी बाबींचा समावेश असेल याची शक्यता जास्त आहे. मात्र, या दिशेने वाटचाल करण्यासाठी भारताला 'युद्धबंदी' असल्याची मानसिकता झिडकारून द्यावी लागेल. या साठी, 'सन १९६२' चे कठोर आत्म-परीक्षण आणि चिकित्सा करत तथ्यांच्या आधारे यशापयशाच्या जबाबदाऱ्या ठरवाव्या लागतील. ही एकमात्र घटना वगळता, स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण आणि लष्करी इतिहास दैदीप्यवान राहिला आहे याचे भान सुद्धा ठेवावे लागेल. युद्धाच्या पन्नाशी निमित्य कटू आठवणींना उजाळा देत बसण्याऐवजी, त्यांची जागा मधुर संबंध कसे घेतील आणि चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याचा विचार करणे राष्ट्र हिताचे आहे. सन १९६२ चे भारत-चीन दरम्यानचे युद्ध दोन्ही देशांच्या ५,००० वर्षांच्या इतिहासातील पहिले युद्ध होते आणि ते अखेरचेच युद्ध ठरावे या साठी दोन्ही देश अधिक परिपक्वता दाखवत मार्गक्रमण करतील असा संकल्प राज्यकर्त्यांनी आणि सुजाण नागरिकांनी या वर्षी करावयास हवा.    

सूत्रधार सारथी


भारताच्या परराष्ट्र धोरणाला आत्मविश्वासाचे बळ देत महत्वाकांक्षेची भरारी घेण्यास उद्द्युत करणारे श्री ब्रजेश मिश्रा वयाची ८३ वर्षे पूर्ण करत असतांना काळाच्या पडद्याआडझालेराजकीय दृष्ट्या विजनवासात असतांना आणि वृद्धापकाळाने निधन झाले असतांना सुद्धा ब्रजेश मिश्रा यांचे जाणे त्यांचे चाहतेस्पर्धक आणि विरोधक या सगळ्यांना चटकालाऊन गेलेसन १९९८ ते २००४ या काळात पंतप्रधानांचे मुख्य सचिव आणि नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची अतिरिक्त जबाबदारी पार पाडत असतांना त्यांनी आपल्याधडाडीच्या कार्यशैलीची छाप कायमची भारतीय राजकारणावर सोडली होतीत्यामुळेत्यांना आदरांजली वाहतांना गोपाळ गांधी यांनी ते 'भारत सरकारहोते असे म्हटले आहेयामध्ये मिश्रा यांच्या कार्याचा आवाका आणि दरारा या दोन्ही गोष्टी सूचित होतातब्रजेश मिश्रा यांनी खऱ्या अर्थाने अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये चाणक्याची भूमिका पारपाडली होतीमिश्रा आणि वाजपेयी या   दोघांचा भूतकाळ पूर्णतभिन्न होताएक पूर्ण काळ सनदी नौकरतर दुसरे पूर्ण काळ राजकारणीमात्र१९९० च्या अस्थिर दशकामध्येदोघांनी काळाची गरज ओळखत एकमेकांची साथ केली आणि भारतीय राजकारणतसेच परराष्ट्र धोरणातीलनव्या पर्वाला सुरुवात झाली.  सन १९९१ ते १९९८ दरम्यानच्याराजकीय आणि धोरणात्मक अनिश्चिततेच्या काळानंतर केंद्रीय राजकारणाला स्थैर्य देण्याचे काम अटल बिहारी वाजपेयी यांनी केले होते,  तर धोरणात्मक नवदृष्टी लावण्याचीजबाबदारी ब्रजेश मिश्रा यांनी खंबीरतेने पार पाडली होती.

वाजपेयींनी आपल्या पंतप्रधान पदावरील काळात ब्रजेश मिश्रांवर पूर्ण विश्वास दाखवत त्यांची आपल्या मुख्य सचिव पदासह नंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या नव्याने निर्मितपदावर सुद्धा नियुक्ती केली होतीमिश्रा यांनी वाजपेयींचा विश्वास सार्थ ठरवत पंतप्रधान कार्यालयाला आलेली अवकळा बदलवून टाकली आणि देशाच्या राजकारणात पंतप्रधानकार्यालयाचा दरारा पुन्हा स्थापित केलाभारतासारख्या विविधांगी देशाचे ऐक्य टिकवण्यासाठी समर्थ आणि ताकतवान केंद्र आवश्यक आहे ही मिश्रा आणि वाजपेयी यांच्याविचारांतील मुलभूत समानता होतीपंतप्रधान कार्यालय हे सामर्थ्यवान केंद्राचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याचे झालेले अवमूल्यन राष्ट्रहिताचे नाहीअशी त्यांची भूमिका होती.२३ पक्षांचे आघाडी सरकार चालवतांना पंतप्रधान कार्यालयाची गरिमा उंचावण्याची किमया मिश्रा यांनी लीलया पेलली होतीही जबाबदारी पार पडत असतांनाच मिश्रायांनीभारतासारख्या विशाल आणि जागतिक सत्ता होण्याची आस असलेल्या देशापुढे सुरक्षेची अनेक आव्हाने उभी असल्याने पंतप्रधानांना वेळोवेळी सल्ला देण्यासाठी राष्ट्रीयसुरक्षा सल्लागाराची नितांत आवश्यकता आहे हे ताडले होतेअमेरिकी राज्यपद्धतीच्या धर्तीवर भारतात सुद्धा असे कायदेशीर पद निर्माण करण्यासाठी त्यांनी धोरणकर्त्यांमध्येचर्चा घडवून आणली आणि वाजपेयी सरकारला हे पद तयार करत करण्यासाठी प्रेरित केलेसाहजिकच नव्या पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणे अपेक्षित होते.  

    सन १९९१ नंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात मुलभूत बदल झाले असून भारताला जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत नव्या मार्गांवर चालण्याची जोखीम उचलावीच लागेल हे ब्रजेशमिश्रा यांनी ताडले होतेआपणास जग कसे हवे आहेया ऐवजी जग जसे आहे त्यात राष्ट्रहित कसे साधता येईल याचा विचार करत निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनीराज्यकर्त्यांवर बिंबवले होतेआदर्शवाद आणि यथार्थवादामध्ये त्यांनी साहजिकच वास्तविकतेचा स्विकार करण्यावर भर दिलाद्वि-ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा अंत होऊनअमेरिकेच्या वर्चस्वातील एक-केंद्रीय व्यवस्थेचा उगम झाला असला तरी ही तात्पुरती व्यवस्था असून नजीकच्या भविष्यात त्याची जागा बहु-ध्रुवीय संरचनेने घेतली जाईल याचीत्यांना खात्री होतीया संभाव्य बहु-ध्रुवीय व्यवस्थेत आपले स्थान भक्कम करण्याची संधी भारताला चालून आल्याने त्याने जागतिक शक्ती प्रमाणे वर्तवणूक करण्यास सुरुवातकेली पाहिजे असे त्यांचे मत होतेयानुसार त्यांनी आधी पोखरण अण्वस्त्र चाचणीचे प्रखर समर्थन केलेआणि नंतर या चाचण्यांमुळे भारताची जागतिक राजकारणात झालेलीकोंडी फोडण्यासाठी अमेरिकाफ्रांसइंग्लंड आणि युरोपीय संघ यांच्याशी द्वी-पक्षीय संबंधांना बळकटी देतरशियासोबतचे परंपरागत संबंध अधिक वृद्धिंगत करण्यास सुरुवातकेलीया वेळी त्यांच्यातील वाटाघाटीच्या कौशल्याची संपूर्ण जगाने दाद दिलीभारताचे विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारशिवशंकर मेनोन यांनीब्रजेश मिश्रांच्या शिष्टाईकरण्याच्या गुणांची आठवण करून देत म्हटले आहे कीआंतरराष्ट्रीय चर्चेत 'देवाण-घेवाणीचासिद्धांत सगळ्यात महत्वाचा असतो असे त्यांचे ठाम मत होतेदोन देशांमधीलमैत्रीपूर्ण चर्चासुद्धा मुळात वाटाघाटीच असतात आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना आपापल्या देशी काही तरी उपलब्धी दाखवणे आवश्यक असते याचे भान त्यांनी नेहमी ठेवल्याचेमेनोन सांगतात
आंतरराष्ट्रीय राजकारणात मित्र आणि शत्रू निर्माण करता येतातमात्र शेजारी बदलता येत नाहीत आणि त्यामुळे शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे नेहमीच राष्ट्रहिताचे आहे असेब्रजेश मिश्रा यांचे ठाम मत होतेश्री लंकेशी मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी  असोत कि नेपालमधील माओवाद्यांना मुख्य धारेत आणण्यासाठीचे प्रयत्न असोतशेजाऱ्यांशीविश्वासाचे संबंध ठेवण्यावर त्यांनी नेहमी भर दिलात्यांच्या प्रयत्नांमुळे चीनशी सीमा प्रश्नावर रखडलेली बोलणी नव्या जोमाने सुरु झालीदोन्ही देशांनी सीमा-प्रश्नावर चर्चा आणिवाटाघाटी करण्यासाठी उच्च-स्तरीय विशेष प्रतिनिधी नेमण्याची योजना मान्य केलीपुन्हावाजपेयींनी भारताचे विशेष प्रतिनिधी होण्याचा मान ब्रजेश मिश्रा यांना दिला.जागतिक राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कायमचा मित्र नसतोया वर त्यांचा विश्वास होता आणि तसे प्रत्यय देखील त्यांना वेळोवेळी आलेतपोखरणचाचण्यांनंतर अमेरिकी प्रशासनाला लिहिलेल्या एका पत्रात भारताने चीनचा बागुलबुवा उभा करण्याचा प्रयत्न केला होतामात्रअमेरिकी प्रशासनाने धूर्तपणे या पत्राचा मजकूरप्रसारमाध्यमांना देत भारत आणि चीन दरम्यानचे वितुष्ट आणखी वाढवण्याची खेळी खेळलीमिश्रा यांनी यातील धोका त्वरीत ओळखत चीन सोबतचे संबंध सुरळीत राहतीलयाची विशेष दक्षता घेतली होतीपरिणामीकारगिल युद्धाच्या वेळी भारताला अडचणीत आणण्याऐवजी चीन ने तठस्थपणाची भूमिका घेतली होती

ब्रजेश मिश्रांची राजकीय विचारसरणी नेहमीच उत्सुकतेचा आणि शंकेचा विषय राहिली आहेकॉंग्रेस पक्षातर्फे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पद  भूषवलेल्या द्वारका प्रसाद मिश्रा यांचे पुत्रअसलेल्या ब्रजेश मिश्रांनी सक्रीय राजकारणाचा मार्ग कधीच चोखाळला नाहीसन १९५१ मध्ये ते भारतीय परराष्ट्र सेवेची परीक्षा उत्तीर्ण होत सरकारी सेवेत रुजू झालेआणि निवृत्तहोईपर्यंत मतभेद असले तरी सरकारी धोरणांची अमंलबजावणी करण्याला प्राध्यान्य दिलेइंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पी.एन.हक्सर यांच्याचमूत ब्रजेश मिश्रांचा सहभाग होतानिवृत्तीनंतर ते वाजपेयींच्या प्रभावाने भारतीय जनता पक्षाकडे आकृष्ट झालेवाजपेयी सरकार मध्ये कार्यरत असतांना त्यांच्या पगडीत अनेकमानाचे पेच रोवल्या गेलेतमात्र अनेक टीकांना त्यांना तोंड द्यावे लागलेविशेषतविमान अपहरण प्रकरणी दहशतवाद्यांची सुटका करण्याचा निर्णय आणि आग्रा शिखर परिषदेचीनिष्फळता याबाबत त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेलालकृष्ण अडवानी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे कीमिश्रा यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरूनकाढण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांवर बराच दबाव टाकलामात्र मिश्रा यांच्यावरील वाजपेयींचा विश्वास डळमळीत झाला नाहीजसवंत सिंगयशवंत सिन्हा आणि जॉर्ज फर्नांडीस यावाजपेयी सरकारमधील धुरिणांचे ब्रजेश मिश्रा यांना कायम समर्थन प्राप्त होतेवाजपेयी सरकारची आणि त्यामुळे त्यांची सुद्धा कारकीर्द संपल्यानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आलेभारत-अमेरिका अणु संधीच्या निमित्त्यानेत्यांनी भाजपच्या भूमिकेशी फारकत घेत डॉ.  मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने होऊ घातलेल्या अणु संधीस पाठींबा दिलायाबद्दलसरकारने त्यांनाभारत-रत्न नंतरचा सर्वोच्च नागरी सन्मानम्हणजे पदम -विभूषणदेत गौरव केलामात्रमिश्रांनी पुरस्कारासाठी सरकार-धार्जिणी भूमिका घेतली असे म्हणणेम्हणजेत्यांचा विश्वास असलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा अवमान ठरेलत्यांच्या मते ज्या-ज्या वेळी राष्ट्र-हितासाठी जी-जी भूमिका आवश्यक होती ती त्यांनी घेतलीआणिम्हणूनच मित्र आणि विरोधक असे सर्वांमध्ये मानाचे स्थान मिळवले.